शिवसेनेचे नेते आढळराव-पाटील आणि भाजपाचे खा. गिरीष बापट `यांच्यात ‘जुंपली’, खासदारांना युतीतील ‘शकुनीमामा’ ठरवलं

पुणे : पोसलीसनामा ऑनलाइन – सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत संर्घर्ष सुरु असून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना दोष देताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार गिरीश बापट यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे युतीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गिरीश बापट हे युतीतील ‘शकुनीमामा’ असल्याचे वादग्रस्त वक्तव्य आढळराव पाटील यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने युती धर्म पाळत एकजुटीने काम केले. तरी देखील माजी खासदार आढळराव पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सध्या विधानसभा निवडणुकीत युती धर्माचे पालन झाले नाही, त्यामुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला, असे सांगत त्यांनी पराभवाचे खापर बापट यांच्यावर फोडले. गिरीश बापट हे ‘शकुनीमामा’ असल्याची घणाघाती टीका आढळराव पाटील यांनी केली आहे.

चाकण येथे शिवसेनेचा निर्धार मेळाव्यात आढळरावांनी गिरीश बापट यांना टार्गेट केले. ते म्हणाले, मागील पंधरा वर्षापासून शिरूर लोकसभा मतदार संघातील जुन्नर-शिरुर-खेड या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला होता. मात्र, यावेळी शिवसेनेला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. या पराभवाचे खापर गिरीश बाटप यांच्यावर फोडताना बापट यांच्यामुळे युतीधर्म पाळला गेला नाही. त्यामुळेच शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला.

सत्ता स्थापनेवरून दोन्ही पक्षामध्ये संर्घष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. त्यातच संजय राऊत यांनी एक बाजू आक्रमकपणे लावून धरत भाजपवर सडेतोड टीका आणि आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकणार नाही असा दावा त्यानी केला असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचाही दावा राऊत यांनी केला आहे.

Visit : Policenama.com