Shivsena Leader Sudhir Joshi | नगरसेवक ते मंत्रिपदापर्यंतचा सुधीर जोशी यांचा प्रेरणादायी प्रवास, वाचा एका क्लिकवर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shivsena Leader Sudhir Joshi | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक सुधीर जोशी (Shivsena Leader Sudhir Joshi) यांचं निधन झालं आहे. सुधीर जोशी यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेब ठाकरेंचे सुधीर जोशी अत्यंत जवळचे सहकारी होते. जानेवारीमध्ये सुधीर जोशींना कोरोनाची लागण झाली होती त्यावेळी त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 

1960 मध्ये मराठी युवकांना नोकरी नाकारण्यात येत होती. त्यावेळी मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या संघटनेमध्ये सुधीर जोशींनी मोलाची भूमिक बजावली. 1968 मुंबई महानगरपालिका निवजणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनंतर शिवसेनेला 73 च्या निवडणुकीत मोठं यश मिळालं, त्यावेळी जोशी यांनी महापौरपदही भूषवलं होतं. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार राहिले.

 

1986 ते 1999 मध्ये ते विधान परिषदेचे आमदार राहिले होते. या काळात 1992- 95 पर्यंत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेही होते. भाजप आणि युती सरकारच्या काळात जोशी यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होतं. मात्र मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी सुधीर भाऊ यांच्याकडे शिक्षण विभाग देण्यात आला होता.

 

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी 1972 मध्ये लोकाधिकार समितीची स्थापना केली होती. त्यावेळी सुधीर जोशींना त्याचं अध्यक्ष केलं होतं.

 

Web Title :- Shivsena Leader Sudhir Joshi | shivsena leader sudhir joshi passes away know about joshi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Municipal Corporation (PMC) | विरोधकांवर महापालिकेच्या जागा बळकवल्याचा आरोप करणार्‍या सत्ताधार्‍यांनीच स्वपक्षाच्या नगरसेवकांवर केली जागांची खैरात

 

Coronavirus in Maharashtra | राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्या स्थिर, गेल्या 24 तासात 6383 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 302 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune NCP | पुणे महानगरपालिकेतील विविध प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

 

How To Relieve Stress Quickly | चुटकीसरशी गायब करायचा असेल ‘स्ट्रेस’ तर जाणून घ्या तणाव दूर करण्याच्या 7 सोप्या पद्धती