अखेर युतीचा ‘फॉर्म्युला’ ठरला ! भाजप 162 तर शिवसेना 126 जागेवर लढणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी घेतली असून यामध्ये काँग्रेसने आपली उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे जागावाटप कधी संपते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर राज्यात आचारसंहिता कधी लागणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

मात्र आता सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने आपले जागावाटप नक्की केल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर शिवसेना नेत्यांनी हा फॉर्म्युला नक्की केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील याला मंजुरी दिल्याने हि युती नक्की झाल्याची माहिती समोर येत आहे.

यानुसार भाजपला 162 तर शिवसेनेला 126 जागा मिळणार आहेत.  शिवसेना नेते सुभाष देसाई आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या चर्चेत हा फॉर्म्युला नक्की केल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही, त्यामुळे  दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे याकडे डोळे लागून आहेत.

दरम्यान, दोनी पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताना मुख्यमंत्रीपदाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर कोण जास्त जागा जिंकतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

visit: Policenama.com