फडणवीसांच्या संकटमोचकास अडचणीत आणण्याची शिवसेनेची ‘रणनीती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदा राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजप-शिवसेना यांचे कोणत्याच मुद्द्यावर एकमत होताना दिसत नाही आहे. आजही सेना-भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

आजच्या सत्रात विरोधकांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा झालेला फायदा या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. सरकारकडून दिल्या गेलेल्या कर्जमाफीमध्ये असंख्य त्रुटी असल्याचे सांगत विधानसभा आणि विधानपरिषदेत दीर्घकालीन चर्चेची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये सिडको मध्ये सुद्धा गैरव्यवहार झाला आहे असे ताशेरे कॅग ने ओढले आहेत, आणि हा कॅगचा अहवाल सभागृहात मांडण्याआधीच कॅबिनेट च्या बैठकीत फुटला आहे. त्यामुळे आज सभागृहांत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत जलसंपदा विभागाने गिरीश महाजन मंत्री असताना दिलेल्या निधीवरूनही आजचा दिवस गाजण्याची शक्यता आहे. आजही सरकार आणि विरोधक यामंध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

आजच्या अधिवेशनात मुंबईतील SRA घरांचे क्षेत्रफळ वाढवण्याबाबत चर्चा होऊ शकते. नाशिकजवळ झालेल्या एसटी चा हा अपघात तांत्रिक की मानवी चुकीमुळे झाला यावरही विधासभेत आज चर्चा होण्याची शक्यता आहे.

You might also like