… तर राज ठाकरे संगीतकार असते, ‘या’ शिवसेनेच्या मंत्र्याचं ‘टीकास्त्र’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला. राज ठाकरे यांचे आडनाव ठाकरे नसते तर आज ते संगीतकार असले असते अशी टीका गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंवर केली. यावेळी गुलाबराव पाटील नाशिक येथील पोटनिवडणूकीच्या प्रचारावेळी बोलत होते.

राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये केली जाते. मनसेच्या नावाची पक्ष राहिलाच तरी कुठे, ही तुमच्याकडे दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही असे म्हणून मनसे पक्षावर त्यांनी निशाणा साधला. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 26 च्या पोटनिवडणूकीसाठी महाविकासआघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारार्थ गुलाबराव पाटील नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपसह मनसेवर निशाणा साधला. कालच्या खातेवाटपात गुलाबराव पाटलांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रीपद मिळाले.

यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की मला पक्षाकडून पाणीपुरवठा व स्वच्छता खाते मिळाले याचा मला आनंद आहे. पाणी हा राज्याती सर्व नागरिकांशी निगडीत विषय आहे. त्यामुळे या खात्याचा मंत्री म्हणून अधिक चांगले काम करायचा प्रयत्न मी करेल. प्रत्येक वाड्या वस्तांसह प्रत्येक गावात पाणी पोहचविण्यावर माझा भर असेल असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/