कुठेही चिखल करा ‘कमळ’ फुलवा असं होऊ देणार नाही : आदित्य ठाकरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्रीपदावरून युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता राज्यपालांच्या अभिभाषणावर मत मांडताना युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. आता पाहिजे तिथे चिखल करा आणि कमळ फुलवा, असे आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भयमुक्त सरकार स्थापन झाले आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.

नोटबंदी आणि जीएसटी या निर्णयामुळे अनेक उद्योग बुडाले. मात्र, आमचं सरकार रोजगार निर्मितीसाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. केजी टू पीजी शिक्षण बदलण्याची गरज आहे. त्यात नोकरीचीही हमी हवी, डिजीटल एज्युकेशन हे गाव पातळीवर न्यावं लागेल, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यपालांचे भाषण लहान असले तरी त्यात कुठेही जुमला नाही. आमचा महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रॉग्रॅम असला तरी कॉमन मॉक्सिमम प्रोग्रेस हे ध्येय, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. सत्तेची हवा कशी असते ते मी पहिलं आणि मित्रांना कसं डावललं जातं ते मी अनुभवलं असं म्हणत तिखट शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. आता आदित्य ठाकरेंच्या टीकेला भाजपकडून काही उत्तर दिलं जाणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/