शिवसेनेला धक्का ! ‘या’ विद्यमान आमदाराने केला राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगा यांना दिलेला शब्द पूर्ण करत त्यांना पालघर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. पण त्यामुळे विद्यमान आमदार अमित घोडा नाराज झाले आणि त्यांनी शिवबंधन सोडत घड्याळ हातात बांधले आहे.

पालघरमधून अमित घोडा हे गेल्या विधानसभेला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र यंदा सेनेने तिकीट कापल्यामुळे घोडा यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

म्हणून उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगा यांना दिले तिकीट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यू पश्चात लोकसभेला तिकट देऊ केले होते. मात्र श्रीनिवास यांनी लोकसभा न लढता विधानसभेसाठी पसंती दर्शवली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार घोडा यांना खाली बसवून वनगा यांना तिकीट दिले आणि लोकसभेवेळी वनगा यांना दिलेला आपला शब्द पाळला.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही इच्छुक नाराजांना हाताशी धरून पक्षामध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पालघरमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत पहायला मिळणार आहे.

Visit : Policenama.com