Shivsena MLA Anil Parab | ‘साई रिसॉर्ट पाडणे आहे’ बांधकाम विभागाची वर्तमानपत्रात टेंडरसाठी जाहिरात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब (Shivsena MLA Anil Parab) यांच्या मालकीचे असलेले साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्यात येणार आहे. त्यामुळे हे रिसॉर्ट पाडण्यासाठी बांधकाम विभागाने टेंडर मागविले आहे. अनिल परब (Shivsena MLA Anil Parab) यांचे हे रिसॉर्ट पुढील तीन महिन्यात पाडण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department (PWD) हे अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. रत्नागिरीच्या दापोली शहरात हे साई रिसॉर्ट स्थित आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केला होता. त्यांनी या विरोधात बराच काळ आवाज देखील उठवला होता. अनिल परब यांनी हे रिसॉर्ट आपले नसल्याचे म्हंटले होते. परंतु सोमय्या यांनी हे रिसॉर्ट अनिल परबांचेच (Shivsena MLA Anil Parab) असल्याचा तगादा लावला होता.

चिपळूण बांधकाम विभागाकडून आज स्थानिक वर्तमानपत्र तरुण भारतमध्ये (Daily Tarun Bharat) टेंडर मागविण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. साई रिसॉर्ट पाडण्यासाठी हे टेंडर मागविण्यात आले आहे.
10 नोव्हेंबरपर्यंत टेंडर भरता येणार आहे. दोपाली येथील साई रिसॉर्ट एनएक्सचे बांधकाम, पोचरस्ता, कंपाऊंड वॉल,
इमारतीच्या भिंती पायापर्यंत पाडायचे आहे. तसेच रिसॉर्ट पाडल्यानंतर उरलेला सिमेंट आणि मातीचा ढिगारा उचलून
त्याची विल्हेवाट लावायची आहे. तसेच रिसॉर्ट पाडून त्या जागेचे सपाटीकरण करायचे आहे,
असे टेंडर मध्ये नमूद आहे.

किरीट सोमय्या यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन याबाबत ट्वीट केले आहे.
तसेच त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये टेंडरचा फोटो देखील ट्वीट केला आहे.

Web Title :- Shivsena MLA Anil Parab | sai resort advertisement released in newspaper for demolition sai resort

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shanikrupa Heartcare Centre | बायपासला करा बाय बाय… शनिकृपा हार्टकेअरच्या प्रव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी प्रोग्राममध्ये भाग घेऊन व्हा दिर्घायुषी

Maharashtra Police Recruitment | बेरोजगारांसाठी खुशखबर! राज्यात 18 हजार जागांसाठी लवकरच पोलीस भरती, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (व्हिडिओ)

Rain in Maharashtra | दिवाळीवर पावसाचे सावट; परतीचा पाऊस लांबला