Shivsena MLA Nitin Deshmukh | ‘…तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन’, नितीन देशमुखांचा शिंदे गटाला थेट इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena)  करत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख (Shivsena MLA Nitin Deshmukh) गुवाहाटी वरून माघारी परतले होते. तेव्हापासून नितीन देशमुख हे सतत शिंदे गटावर (Shinde Group) आक्रमकपणे टीका करत आहेत. आता नितीन देशमुख (Shivsena MLA Nitin Deshmukh) यांनी राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे गटावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाचे सूरत ते गुवाहाटीमधील अनेक व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा देशमुख यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात केला आहे.

शिवसैनिकांशी (Shiv Sainiks) संवाद साधताना नितीन देशमुख (Shivsena MLA Nitin Deshmukh) म्हणाले, राज्यात पैशांच्या मदतीने सत्तांतर झाले असून मी ते सिद्ध करु शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत (Assembly) आत्महत्या (Suicide) करेन, असे मोठे विधान नितीन देशमुख यांनी केले आहे. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पाडण्यासाठी 50 खोके एकदम ओकेचं षडयंत्र मागील दीड वर्षापासून सुरु होते. हे षडयंत्र आताचे नव्हते. त्यांनी माझ्यावर पुन्हा चुकीची कारवाई केली, तर मी माझ्याकडील क्लीप बाहेर काढणार. त्यांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवले. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत, असे देशमुख म्हणाले.

काही दिवसांपूर्वी माझी लाचलुचपत विभागामार्फत चौकशी (ACB Inquiry) सरु करण्यात आली.
खरंतर माझी ईडीकडून चौकशी (ED Inquiry) करायला हवी होती, ईडीकडून चौकशी झाली असती तर समाजात माझा मान वाढला असता, अशी खोचक टीका देशमुख यांनी केली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भेटत नव्हते.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना आम्हाला वाचवायची होती.
बाळासाहेबांचे विचार आम्हाला वाचवायचे होते, असे काही नेते सांगतात.
परंतु त्यांच्या आवाजाची क्लिप जर मी बाहेर काढली तर खरं काय ते समोर येईल.
राज्यात पैसे घेऊन सत्तांतर झालं, हे जर सिद्ध करु शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या
केल्याशिवाय राहणार नाही, असेही देशमुख म्हणाले.

यावेळी शिवसेनेला डुप्लिकेट सेना म्हणणाऱ्या नारायण राणेंचा (Narayan Rane) देशमुख यांनी समाचार घेतला.
नारायण राणेंनी शिवसेनेला डुप्लिकेट सेना म्हटल्याचे ऐकलंय.
पण तुम्ही पाहिलं तर नारायण राणेंच्या डोक्यावर खोटे केस आहेत.
वयाच्या 70 व्या वर्षी डुप्लिकेट केस लावावे लागतात, याची तुम्हाला लाज वाटू द्या, असा टोला त्यांनी लगावला.

Advt.

Web Title :- Shivsena MLA Nitin Deshmukh | cm eknath shinde government form with help of rupees alleges shiv sena mla nitin deshmukh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Accident |  हडपसर-सासवड रोडवर कंटेनर व शिवशाही बसचा भीषण अपघात

Pune Crime | पोलिसाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; विमाननगर परिसरातील घटना

Osmanabad Crime | विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या