Shivsena MLA Ramesh Latke | शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके (Shivsena MLA Ramesh Latke) यांचं दुबईमध्ये (Dubai) आकस्मिक निधन (Died) झालं आहे. रमेश लटके हे 52 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने लटके यांचं निधन झालं असून ते आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी सहकुटुंब दुबईला गेले होते. तेव्हाच हा प्रकार घडला असून या वृत्तामुळे शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.

आमदार रमेश लटके  यांच्या निधनाची वार्ता कळताच अंधेरीमधील लटके यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. असं असतानाच दुसरीकडे राजकीय श्रेत्रातील व्यक्तींकडूनही लटके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे  यांच्यासहीत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी देखील ट्विटरवरुन लटके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री अचानक लटके यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लटके यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांचे कुटुंबिय शॉपिंगसाठी गेले होते अशी माहितीही मिळत आहे. सध्या त्यांचे पार्थिव दुबईवरून मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title : Shivsena MLA Ramesh Latke | shivsena mla ramesh latke dies of heart attack in dubai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन