Shivsena MLA Shahajibapu Patil | ‘तालुक्यात सेनेला फक्त 1100 मतं होती, भाजपच्याच पाठिंब्यावर निवडून आलो’, शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोटाने प्रचंड खळबळ

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजप सोबत असलेली युती (Shiv Sena-BJP Alliance) तोडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) सोबत महाविकास आघाडीची स्थापन करुन सरकार स्थापन (MVA Government) केले. त्यामुळे राज्यात सर्वाधिक जागा जिंकून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. मात्र, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतून गुंता झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेना एकत्र असल्याने त्यांची गोची झाल्याचे पहायला मिळत आहे. सोलापूरच्या सांगोल्यातील शिवसेना नेते आमदार (Sangola Shiv Sena MLA) शहाजीबापू पाटील (Shivsena MLA Shahajibapu Patil) यांच्या विधानामुळे पुन्हा स्थानिक वाद समोर आला आहे. तालुक्यात सेनेला फक्त 1100 मतं होती, भाजपच्याच पाठिंब्यावर निवडून आलो, असा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील (Shivsena MLA Shahajibapu Patil) केला आहे.

 

सांगोल्या तालुक्यात शिवसेनेला फक्त 1100 मते मिळाली होती. पण भाजपच्या पाठिंब्यावर मी निवडून आलो, आमदार झालो. खासदार रणजित निंबाळकर (MP Ranjit Nimbalkar) यांच्यामुळेच मला आमदारकी मिळाली. भाजपचे माझ्यावर चांगले लक्ष होते. कुठे काही कमी पडते का, याबद्दल विचारणा करण्यासाठी त्यांचा फोन येत होता, असा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील (Shivsena MLA Shahajibapu Patil) यांनी केला आहे.

सांगोल्यात तब्बल 18 वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना यंदा भाजपच्या साथीसोबत राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाल्याचे गुपित त्यांनी पंढरपूर येथील एका कार्यक्रमात उघड केले.
विशेष म्हणजे सांगोला हा दिवंगत शेकाप नेते गणपतराव देशमुख (Ganapatrao Deshmukh) यांचा मतदार संघ होता.
यंदाच्या निवडणूकीत ते स्वत: उमेदवार नव्हते.
मात्र त्यांनी दिलेल्या उमेदवाराचा पराभव करत शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळवला होता.
घर की कोंबडी दाल बरा बर होऊन बसलंय, आमचा कुणी विचार करायला तयार नाही, गप्प बसा जा गावकडे,
असं म्हणत पाटील यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली.

 

Web Title :- Shivsena MLA Shahaji Bapu Patil | shivsena had only 1100 votes in the taluka we were elected with the support of bjp say shiv sena mla shahaji bapu patil PG

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tax Saving Scheme | टॅक्स वाचवण्याच्या एकदम सोप्या पद्धती, ‘या’ टॉप-5 सरकारी योजनांमध्ये करा गुंतवणूक; जाणून घ्या

 

Corona in Mumbai | मुंबईकरांनो सावधान! आज 19,474 नवीन रुग्णांची नोंद, ओमायक्रॉनचे 40 नवीन रुग्ण

 

Omicron Covid Variant | राज्यात आज ओमायक्रॉनचे 207 नवीन रुग्ण रुग्ण, पुणे जिल्ह्यात 37 रुग्ण