शिवसेना मोदी सरकारच्या पाठिशी

नवी दिल्ली : पाेलीसनामा ऑनलाईन

मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश शिवसेनेच्या खासदारांना पक्ष् नेतृत्वाकडून देण्यात आले आहेत, असे समजते.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a54cf0a9-8b44-11e8-8947-ebb10a937b01′]

मोदी सरकारच्या विरोधात तेलगु देशम पक्षाने अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाने या प्रस्तावाला पाठिंबा देऊ केला आहे. लोकसभेतील संख्याबळाच्या गणितात शिवसेनेला महत्त्व आले आहे. केंद्र सरकारवर आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेनेने गेले काही महिने धारदार टीका केली आहे. भाजपनेही शिवसेनेला न जुमानता कोकणातील नाणार प्रकल्प पुढे रेटला आहे. मध्यंतरी अमित शहा यांनी मुंबईत येऊन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

त्यानंतरही दोन्ही पक्षात संबंध ताणलेले राहिले. त्यामुळे मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास ठराव दाखल झाल्यावर शिवसेनेची भूमिका काय ? हा प्रश्न निर्माण झाला. मनसेकडूनही याबाबत खोचक विचारणा करण्यात आली. दरम्यान, शिवसेनेने खासदारांना सभागृहात उपस्थित रहाण्यासंबंधी व्हीप बजावला असून अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान करा असे आदेश दिले.