Shivsena MP Bhavana Gavali | ईडीचा दणका ! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ED चा छापा

यवतमाळ / वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Bhavana Gavali। शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना नुकतंच सक्तवसुली संचालनालया (ED) कडून नोटीस बजावली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. असं असतानाच आणखी एक राज्यात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेत्या आणि यवतमाळच्या (Washim) खासदार भावना गवळी (Shivsena MP Bhavana Gavali) यांच्या 5 संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे.

नुकतंच भाजपने खासदार भावना गवळी (MP Bhavana Gavali) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप (Allegations) केला गेला होता. यांनतर त्याची तक्रार सक्तवसुली संचालनालयाकडे (ED) करण्यात आली होती. दरम्यान, ED ने खा. भावना गवळी (MP Bhavana Gavali) यांच्या वाशिम, यवतमाळ मधील संस्थांवर धाडी टाकल्या आहेत. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर धाड टाकली असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, मुख्यतः म्हणजे सक्तवसुली संचालनालयाचे (ED) अनेक पथक वाशिम शहरात दाखल झाले आहे.

CBSE ने बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये केला मोठा बदल, यावर्षी दोन टप्प्यात होईल परीक्षा

सक्तवसुली संचालनालयाचे (ED) वाशिम जिल्ह्यातील रिसोड या ठिकाणी या धाडी टाकल्याचं म्हटलं जात आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, BMS कॉलेज, भावना अ‍ॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ED ने धाडी टाकल्याचं म्हटलं जात आहे. या दरम्यान, खा. भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर शंभर कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. खा. भावना गवळी यांच्यावर भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खा. भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा सोमय्यांनी केला होता.

काय आहे प्रकरण?

श्री बालाजी पार्टीकल बोर्ड (Shri Balaji Particle Board) नावाने शिवसेना खा. भावना गवळी
यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचं, तर राज्य
सरकारने 14 कोटी रुपयांचं अनुदान दिलं. परंतु, 43 कोटी रुपयांचं अनुदान घेऊन देखील खा.
भावना गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट 7 कोटी रुपये रक्कम दाखवून हा कारखाना
गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकला. याप्रकरणी खा. गवळी यांनी CA उपेंद्र मुळे यांच्यावर
चुकीचा रिपोर्ट तयार करून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.

हे देखील वाचा

Upcoming IPOs | सप्टेंबरमध्ये येताहेत आणखी 2 कमाईच्या संधी, जाणून घ्या किती रुपयांची करावी लागेल गुंतवणूक?

Earn Money | केवळ एक एकरच्या शेतीत 6 लाख रुपयांची करा कमाई, सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Shivsena MP Bhavana Gavali | enforcement directorate ed raids on shiv sena mp bhawana gawli washim yavatmal after bjp complaint anil parab ed notice

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update