Shivsena MP Bhavana Gawali | शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Shivsena MP Bhavana Gawali | नुकतंच सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना नेत्या आणि खासदार भावना गवळी (Shivsena MP Bhavana Gawali) यांच्या 5 असलेल्या संस्थावर छापेमारी (Raid) केली आहे. या पार्श्वभुमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळुन निघालं आहे. दरम्यान त्याची आजही चर्चा सुरु आहे. तसेच आज सक्तवसुली संचालनालयाचे (ED) त्रिसदस्यीय पथक आता पुन्हा वाशिम (Washim) येथे दाखल झालं आहे. ईडी पथकाने सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात धडक देऊन भावना गवळींच्या (MP Bhavana Gavali) संस्थांशी संबंधित दस्तावेजांची तपासणी केली. यावरुन आता गवळी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे.

यांनी 20 ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Shivsena MP Bhavana Gawali) आणि नंतर भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी वाशिम येथे पत्रकार परिषद घेतली. किरीट सोमय्या यांनी खासदार गवळींवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. तर भावना गवळी यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांनी 500 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप केला होता. त्यानंतर काहीच दिवसांत भावना गवळी यांच्या संस्थांची थेट सक्तवसुली संचालनालयाकडून (‘ED’) चाैकशी सुरू झाली. यावरुन राजकारण चांगलंच ढवळुन निघत आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

खासदारकीच्या कार्यकाळात विविध माध्यमातून 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गवळी यांच्यावर केला होता.
घोटाळ्यांसंबंधीचे सर्व सबळ पुरावे आपणाकडे असून यासंबंधी ‘ED’ कडेही तक्रार दाखल केली, असं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
त्यांनतर लगेच काही दिलसात सक्तवसुली संचालनालयाने खा. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानअंतर्गत चालणाऱ्या 5 संस्थांवर छापेमारी केली.
गेली 4 दिवस झालेल्या धाडीनंतर ED टीम आज (3 सप्टेंबर) रोजी पुन्हा एकदा वाशिममध्ये दाखल झाली आहे.
ED पथकाने थेट धर्मादाय आयुक्त कार्यालयात जावुन महिला उत्कर्ष प्रतिष्ठानांतर्गत चालणाऱ्या संस्थांशी संबंधीत दस्तावेजांची तपासणी केलीय.
यावरुन खा. गवळी यांच्या अडचणी वाढत्याल्या दिसत आहेत.

Web Title : Shivsena MP Bhavana Gawali | increased difficulty bhavana gawli eds team enters washim

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 152 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | अपहाराच्या पैशांतून खरेदी केली 66 लाखांची BMW ! परदेशातील बँक खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात वळवले

National Nutrition Week 2021 | ‘या’ 8 गोष्टींमध्ये सर्वात जास्त पोषकतत्व, तुम्ही देखील खाण्यास सुरूवात करा; जाणून घ्या