तर… दिवंगत प्रमोद महाजन जगले असते

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्याकडे डॉक्टरची डिग्री नाही. पण मी अनेक लोकांना बरे केले आहे. माझ्या पुडीने आणि जपाने रुग्ण बरे होतात. माझी भस्माची पुडी दिवंगत प्रमोद महाजन यांना लावू दिली असती तर ते जगले असते. असे अजब वक्तव्य शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व पक्षांनी कार्यकर्ता बैठक, सभा, पत्रकार परिषद, याचबरोबर मेळावाही घेण्यास सुरवात केली आहे. याचदरम्यान राज्यसरकारच्या वतीने आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दरम्यान उपस्थितांना संबोधित करतांना माझ्याकडे डॉक्टरची डिग्री नाही. पण मी अनेक लोकांना बरे केले आहे. त्यामुळे मी रुग्णालयात लोकांना भेटायलाही जातो. मी रुग्णाची नाडी धरून जर केला तर रुग्ण बरे होतात. असा अजब दावा शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

इतकेच नव्हे तर, माझी भस्माची पुडी दिवंगत प्रमोद महाजन यांना लावू दिली असती तर ते जगले असते. असेही त्यांनी म्हंटले. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या खासदाराने असे अजब वक्तव्य केले असल्याने उपस्थित असलेले सर्वच थक्क झाले होते.