Shivsena | चालते व्हा, शिवसेनेकडून कारवाई सुरुच, शिंदे गटात सामील खासदारांची पदावरून हकालपट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर दिल्लीतही पक्षाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी (MP Revolt) वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर कारवाई केल्यानंतर खासदारांवर कारवाई करण्यात आली. बंडखोरी करणाऱ्या खासदारांची पदावरुन हकालपट्टी (Expulsion) करण्यात आली आहे.

 

बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांची शिवसेना (Shivsena) जिल्हा संपर्क प्रमुख (District Liaison Head) पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासह एक जिल्हा प्रमुख (District Head), दोन उपजिल्हा प्रमुख (Deputy District Head) आणि तीन तालुका प्रमुखांनाही पक्षातून काढून टाकले आहे. शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर खासदार शिंदे गटाच्या (Shinde Group) गळाला लागले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदारांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार प्रतापराव जाधव हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे जाधव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्या आदेशावरुन पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. असं शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मधून जाहीर करण्यात आले आहे. प्रतापराव जाधव हे शिंदे गटात सामील झाल्याने पक्षविरोधी कारवाई करत असल्याच ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावरुन ही कारवाई केली आहे.

जाधव यांच्यावरच कारवाई का?
देशात नुकतीच राष्ट्रपतिपदाची निवडणूक (Presidential Election) पार पडली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईत शिंदे गटाच्या 40 आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hotel) बैठक पार पडली. या बैठकीत दिल्लीहून शिवसेनेचे 12 खासदार ऑनलाईन उपस्थित होते. विशेष म्हणजे, त्यात बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश होता. एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात 11 खासदार होते. पण दोन तृतीयांश आकडा गाठण्यासाठी एका खासदाराची आवश्यकता होती. त्यानंतर कोल्हापूरचे दोन्ही शिवसेनेचे खासदार शिंदे गटात येण्यास तयार झाले. त्यानंतर आयोजित बैठकीला 2 खासदार होते. त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली.

 

हे खासदार बैठकीला उपस्थित होते
श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), राहुल शेवाळे, हेमंत पाटील (Hemant Patil), संजय मंडलिक (Sanjay Mandalik),
राजेंद्र गावीत (Rajendra Gavit), प्रतापराव जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे (Hemant Godse),
कृपाल तुमाने (Kripal Tumane), श्रीरंग बारणे (Shrirang Barane), धैर्यशील माने (Darsheel Mane),
सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande)

 

Web Title :- Shivsena | mp pratap jadhav sacked from the post of district chief by shivsena uddhav thackeray at buldhana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट कबुली

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…