शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेत मागणी, म्हणाल्या – ’33 टक्के का?, महिलांना 50 % आरक्षण द्या’

पोलीसनामा ऑनलाईनः देशात 24 वर्षांपूर्वी महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याबाबत सांगण्यात आले होते. परंतु आता ते 33 टक्क्यांवरून वाढवून 50 टक्के करण्याची गरज आहे. देशातील महिलांची लोकसंख्या 50 टक्के आहे. तर महिलांचे प्रतिनिधीत्व देखील 50 टक्के असले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सभागृहात केली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सोमवारी (दि. 8) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला खासदारांनी आपले विचार मांडले. राज्यसभेचे कामकाज सुरु होताच सभागृहात महिला खासदारांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या दरम्यान, महिला आरक्षणाचा विषय सभागृहात आला. त्यावेळी महिलांना केवळ 33 टक्के आरक्षण का दिल जातय 50 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी खासदार चतुर्वेदी यांनी केली. त्या म्हणाल्या की, लॉकडाऊनमध्ये महिलांवरील कौटुंबिक अत्याचार वाढले अशा परिस्थितीत या विषयांवर सभागृहात चर्चा होणे आवश्यक आहे. महिलांना त्यांचे अधिकार देणे गरजेेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान एकीकडे खासदार चतुर्वेदी यांनी महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याबद्दल सदनात भाष्य केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते कार्ति चिदंबरम यांनी एक ट्विट करत तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 33 टक्के तिकिट महिलांनाच द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.