धक्कादायक ! शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी 2 कोटींची सुपारी, पोलिसांकडे तक्रार दाखल

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – परभणीमधील शिवसेना ( Shivsena) खासदार संजय जाधव ( Sanjay Jadhav) यांना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली आहे. याबद्दल संजय जाधव यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात ( Nanalpeth Police Station) तक्रार दिली आहे.

संजय जाधव यांच्याकडून २ कोटींची सुपारी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. खासदार संजय जाधव यांनी आपली हत्या ( Murder) करण्यासाठी नांदेडमधील रिदा गँगला ( Rida Gang) दोन कोटींची सुपारी दिल्याचे आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

परभरणीमधील ( Parbhani) एका मोठ्या व्यक्तीकडून ही सुपारी देण्यात आली आहे असे संजय जाधव यांचे म्हणणे आहे. संजय जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून एक चौकशी समिती नेमण्यात आली असून या प्रकरणाचा संपूर्ण तपास केल्यानंतरच गुन्हा ( Crime) दाखल करण्यात येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like