Shivsena MP Sanjay Jadhav | ‘पूर्वी जुन्या मित्राने ‘ठोकली’ आता नवीन ठोकतोय ! पुण्यात शिवसैनिकांना पक्षाकडून पाठबळ मिळत नाही, म्हणून..’ – शिवसेना खासदार संजय जाधव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Jadhav | पुण्यातील शिवसेनेच्या (Pune Shivsena) कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. परंतु पक्षाकडून पाठबळ मिळत नाही. अगोदर युतीमध्ये जुन्या मित्राने ‘ठोकली’ आता आघाडी मध्ये नवीन मित्र ठोकतोय, अशी भावना शिवसैनिकांची असून त्यांना पाठबळ देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून विशेष प्रयत्न व्हायला हवेत, ही बाब पक्ष प्रमुखांच्या कानावर घालणार असल्याचे शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय तथा बंडू जाधव (Shivsena MP Sanjay Jadhav) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेनेच्या वतीने राज्यभर शिवसंपर्क अभियान मोहीम सुरू आहे. या मोहिमेची पुण्यातील (Pune News) जबाबदारी संजय तथा बंडू जाधव (Shivsena MP Sanjay Jadhav) यांच्याकडे देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सरकारने केलेली विकास कामे आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती शिवसैनिकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जाधव यांनी कालपासून विविध मतदारसंघामध्ये जावून शाखाप्रमुख, प्रभाग प्रमुख, गटप्रमुख यांच्यासोबत संवाद साधला. पुढील दोन दिवस ही मोहीम कायम राहणार असून रविवारी गणेश कला क्रिडामंच येथे मेळाव्याने याचा समारोप होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे (Sanjay More Shivsena) यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी शहर प्रमुख गजानन थरकुडे (Gajanan Tharkude Shivsena), माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar Shivsena) उपस्थित होते.

संजय तथा बंडू जाधव म्हणाले की, ”कालपासून कसबा (Kasba), कोथरूड (Kothrud), वडगाव शेरी (Wadgaon Sheri) मतदार संघातील पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. यामध्ये शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा दिसून आली. परंतु त्यांना पक्षाकडून पाठबळ मिळत नाही, ही वस्तुस्थिती देखील समोर आली. पूर्वी भाजपसोबत (BJP) युती होती. पूर्वी त्यांनी ठोकली. आता महाविकास आघाडी आहे. आता नविन मित्र ठोकत आहे, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) उल्लेख टाळत शिवसैनिकांमधील नाराजी मांडली. त्याचवेळी मित्र काय करतात याला शिवसैनिक बधणार नसून लढणार आहेत.”

”सत्तेत असून ही संपूर्ण पुणे जिल्ह्यात एक खासदार व्यतिरिक्त अन्य कुठलेही पद नाही. संपर्क प्रमुख आपापल्या परीने चांगले काम करत आहेत. परंतु जिल्ह्यातुन शिवसैनिकाची किमान महामंडळावर वर्णी लागावी जेणेकरून शिवसैनिकांमध्ये नवचेतना निर्माण होईल. शिवसंपर्क मोहिमेमध्ये शिवसैनिकांनी व्यक्त केलेल्या भावना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचेही,” जाधव यांनी सांगितले.

Shivsena MP Sanjay Jadhav | ‘Old friend used us, now new one is using! In Pune, ShivSainiks do not get support from the party, therefore .. ‘- Shiv Sena MP Sanjay Jadhav

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त