Shivsena MP Sanjay Raut Arrest | संसदेचे अधिवेशन सुरु असताना अटक झालेले संजय राऊत पहिलेच खासदार

0
247
Shivsena MP Sanjay Raut Arrest Sanjay Raut is the first MP to be arrested during the session of Parliament
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut Arrest | संसदेचे अधिवेशन सुरु असताना कोणतेही सरकार शक्यतो खासदारांवर कारवाई करत नाही. कारण अधिवेशन काळात त्यांना विशेषाधिकार असतात. तसेच कारवाई करण्यापूर्वी ते ज्या सभागृहाचे सदस्य असतात त्या सभागृहाच्या सभापतींची परवानगी काढावी लागते. त्यामुळे अधिवेशन काळात शक्यतो कोणत्याही खासदारावर फौजदारी कारवाई केली जात नाही. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरु असताना सक्तवसुली संचालनालयाने आज पहाटे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना अटक केली. अधिवेशन काळात अटक झालेले संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut Arrest) हे बहुदा देशातील पहिलेच खासदार असतील. देशाच्या हितासाठी कायदे तयार करत असताना सदस्यावर कोणताही दबाव येणार नाही, यासाठी खासदार आणि आमदार यांना लोकप्रतिनिधी म्हणून काही विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत.

 

अटकेपासून संरक्षण – दिवाणी खटल्यांबाबत सभागृहातील कोणत्याही सदस्याला सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी ४० दिवस किंवा सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर ४० दिवस अटक करण्यात येत नाही. तसेच जर एखादा सदस्य सभागृहातील कोणत्याही समितीचा सदस्य असेल तर त्याला समितीच्या बैठकीअगोदर ४० दिवस आणि बैठकीनंतर ४० दिवस अटक करण्यात येत नाही. हे अटकेचे सरंक्षण फक्त दिवाणी खटल्यांपुरते असते. फौजदारी खटल्यांपासून असे सरंक्षण नसते. अशा प्रकरणात जर सदस्याला अटक करायची झाल्यास अगोदर सभापतींना माहिती द्यावी लागते. महत्वाचे म्हणजे सदस्याला सभागृहात अटक करता येत नाही.

 

सभागृहाचे कामकाज सुरु असताना सदस्याला सभापतींच्या परवानगीशिवाय कोर्टात बोलता येणार नाही. तसेच कोणत्याही कोर्टाच्या कामात साक्षीदार होण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक असते. अनेकदा अधिवेशन काळात खासदार आंदोलन करतात. तेव्हाही पोलीस आंदोलन हाताळताना खासदारांना ताब्यात घेतात. पण त्यांना शक्यतो अटक करत नाही. (Shivsena MP Sanjay Raut Arrest)

 

संजय राऊत यांना अटक टाळता आली असती ?

खासदारांना अधिवेशन काळात मिळणार्‍या सरंक्षणानुसार, अधिवेशन सुरु असताना ईडीने संजय राऊत यांना चौकशीला बोलावले होते.
त्यावर त्यांनी अधिवेशन सुरु असल्याने आता येता येणार नसल्याचे कळविले होते.
तरीही ईडीने आणखी समन्स पाठविले.
अधिवेशन सुरु असल्याने ईडी दिल्लीत जाऊन संजय राऊत यांच्यावर कारवाई करु शकत नव्हती.

 

शुक्रवारी संसदेचे अधिवेशन स्थगित झाल्यानंतर शनिवार, रविवार सुट्टी होती.
त्यामुळे संजय राऊत मुंबईला आले. अधिवेशन सुरु असल्याने ईडी काही कारवाई करणार नाही,
अशी अटकळ संजय राऊत यांनी बांधली असावी, त्यातूनच ते मुंबईत आले असावे.
पण त्यांचा अंदाज फोल ठरवत, ईडीने कारवाई केली आहे.
जर संजय राऊत अधिवेशनाचे कारण सांगून दिल्लीतच थांबले असते तर ईडीला कारवाई करणे अवघड झाले असते.
ईडीला त्यांना अटकही करता आली नसती.

 

Web Title : – Shivsena MP Sanjay Raut Arrest | Sanjay Raut is the first MP to be arrested during the session of Parliament

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा