Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा; म्हणाले – ‘लायकीत राहा, राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे. राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ या ठिकाणीच ठिय्या मांडला असतानाच दुसरीकडे भाजप (BJP) नेत्यांची बैठक असल्याचे बोललं जात आहे. त्याचबरोबर राज्यात राष्ट्रपती राजवट (Presidential Rule) लागू करण्याच्या चर्चा देखील होताना दिसत आहेत. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

नागपूर (Nagpur) येथे बोलत असताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, ”आमच्या घरावर येऊन आम्हालाच आव्हान देत असाल तर हा शिवसैनिक खंबीर आहे. त्याला कोणाच्या संरक्षणाची गरज नाही. आव्हान द्याल तर, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. CBI मागे लावा, ED लावा, आम्हाला त्रास द्या आम्हाला काही फरक पडत नाही. तुमच्या लायकीप्रमाणे राहा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या देऊ नका,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले, ”दोन दिवसांत या ज्या घटना पाहत आहोत. हा शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नाही, अजून काहीच सुरुवात झालेली नाही.
राणा दाम्पत्य ‘मातोश्री’ ला बदनाम करत आहे. तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे वागा.
‘झुंडशाही’ ला झुंडशाही प्रमाणे उत्तर देऊ.
महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी ७ जन्म घ्यावे लागतील.
तुम्ही जर आमच्यावर हात उगारायचा प्रयत्न कराल, तर लाखो शिवसैनिक गप्प बसणार नाही.
तुम्ही घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हालाही घर आहे हे लक्षात ठेवा.
शिवसैनिक मरायला आणि मारायलाही तयार आहेत.” असे ते म्हणाले.

 

Web Title :-  Shivsena MP Sanjay Raut | dont threaten to impose presidential rule shivsena MP sanjay raut MP Navneet Rana MLA Ravi Rana at Matoshree

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा