रश्मी ठाकरेंना पत्र लिहिण्याची घोषणा, चंद्रकांत पाटलांविषयी संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

पोलिसनामा ऑनलाईन – माझ्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरत टीका करण्यात येते. तसंच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. ही भाषा तुम्हाला मान्य आहे का, हे विचारण्यासाठी मी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना पत्र लिहिणार आहे,’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांच्या या विधानावर आता शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Editor Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘जर चंद्रकांत पाटील हे रश्मी ठाकरे यांना पत्र लिहीत असतील तर बाप रे ताबडतोब लगेच लिहा. भीती वाटते मला त्यांची ते पत्र लिहीत आहेत,’ असं म्हणत संजय राऊत यांनी टीकाटिप्पणी करत चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला आहे.

औरंगाबादचं संभाजीनगर करण्यामध्ये कोणतंही राजकारण नाही. याचं नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी ३० वर्षांपूर्वीच केलं आहे. सरकारी कागदपत्रावर आता नाव बदलायचं नाव आहे. महाविकास आघाडीत हा मतभेदचा विषय नाही. विरोध असेल तर सगळे बसून हा प्रश्न सोडविला जाईल,’ अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. काँग्रेस नेते जे महाराष्ट्रत आहेत, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण जे कोणी नेते असतील त्यांचं प्रेम, श्रद्धा ही औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवर जास्त असणार आणि आहे. प्रत्येक हिंदूंची श्रद्धा यावर आहे. शहराच्या नावावरून काही मतभेद असू शकत नाही.