Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल…’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेली मोठी भूमिका महाराष्ट्राला हादरवून (Maharashtra Political Crisis) टाकत आहे. सध्या शिवसेनेचे बंडखोर आमदार आसामच्या गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे आपल्या मतावर ठाम आहेत. भाजपसोबत (BJP) युती करा असा एक नाराच त्यांनी लगावला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

या सर्व घडामोडींवर बोलताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले की, “शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळवता येते, पण पक्षाचीही प्रतिष्ठा असते,’ असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्याशी आज सकाळीच फोनवरुन तासभर चर्चा झाली असल्याची,” माहिती देखील राऊत यांनी दिली आहे.

 

पुढे संजय राऊत म्हणाले, “झालेल्या चर्चेची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोपं नाही, असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदेंचं बंड शांत होईल,’ असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.
दरम्यान, ‘आसाममध्ये सर्व आमदार सध्या पर्यटनासाठी गेले आहेत. आमदारांनी फिरायला हवं, नाराज कोणीच नाही.
एकनाथ शिंदेंसोबत सतत संपर्कात आहोत. शिवसेनेचे नेतेही त्यांच्याशी संपर्क साधत आहेत,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | maharashtra shivsena mp sanjay raut on maharashtra political crisis eknath shinde and mla at assam guwahati

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा