Shivsena MP Sanjay Raut | ‘… म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | राज्यसभा निवडणूकीच्या (Rajya Sabha Election 2022) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळत चाललं आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. अशातच काही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील हाॅटेलमध्ये ठेवलं आहे. यावरुन ‘आपल्या आमदारांवर विश्वास नाही का?’ असा सवाल भाजपकडून केला जातोय अशात शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

त्यावेळी बोलताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, “या निवडणुकीसंदर्भात तज्ज्ञांचं काय मत आहे याबाबत आजची बैठक आहे. आघाडीचे सर्व आमदार मुंबईत पोहोचले आहेत. तिनही पक्षांनी त्यांच्या आमदारांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं आहे. घाबरल्याने या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय असं नाही. तर या निवडणुका तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मतदान कशाप्रकारे करावं कोणत्या पद्धतीने करावं याबाबत आमदारांना मार्गदर्शन महत्त्वाचं आहे, त्याच दृष्टीने ही बैठक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे.”

 

पुढे संजय राऊत म्हणाले, “जेव्हा आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्या आघाडीच्या सरकारला लहान पक्षांचा पाठिंबा होता. अनेकदा त्यांच्या काही मागण्या असतात, त्या मागण्या काहीवेळा मान्य होत नाहीत अथवा अडकलेल्या असतात. त्यामुळे ही एक संधी असते मुख्यमंत्र्यांकडून, सरकारकडून आपली मतदारसंघातील कामे मार्गी लावण्याची. ते चुकीचंय असं मला वाटत नाही. परंतु, समाजवादी पक्ष, प्रहार असेल, बविआ असेल या सगळ्या लहान पक्षांनी मविआचं सरकार स्थापन होत असताना जो विश्वासदर्शक ठराव झाला आणि आम्हाला 170 मतं मिळाली त्यात हे सगळे समाविष्ट होते आणि ते आताही आमच्याबरोबर राहतील.”

दरम्यान, “मविआच्या स्थापनेनंतर हा पहिला प्रसंग आहे जिथे एकमेकांची शक्ती किती हे दाखवण्याची संधी प्राप्त झालीय.
मधल्या काळात कुठेही मतदान झालं नाही, त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी संधी आहे, आम्हाला पूर्ण बहुमत आहे.
हे आम्ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेत आहे, आमच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नाही, आम्ही रिलॅक्स आहोत,
आमचे आमदार रिलॅक्स आहेत, आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांशी सुसंवाद सुरु आहे.” असं संजय राऊत म्हणाले.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | rajyasabha election 2022 why shivsena mla put in hotel before rajyasabha election 2022 sanjay raut says reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ACB Trap On Police Sub Inspector | आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक (PSI) 3 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

 

Pradip Bhide Passes Away | दूरदर्शनचा चेहरा ‘हरपला’ ! सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे याचं 65 व्या वर्षी निधन

 

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोन्याच्या दरात तेजी कायम, तर चांदी उतरली; जाणून घ्या