संजय राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना फार गांभीर्याने घेऊ नका’

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना फार काही गांभिर्यानं घेऊ नका, असा जोरदार निशाणा शिवसेना Shiv Sena नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर साधला आहे. चंद्रकात पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवसेना पिंजऱ्यातला वाघ असेलही, पण वाघ Tiger वाघच असतो आम्ही पिंजऱ्याची दार उघडी ठेवली आहे. हिंमत असेल तर त्यांनी पिंजऱ्याच्या आत येऊन वाघाच्या मिशिला हात लावून दाखवावा, असं म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटलांवर (Chandrakant Patil) खोचक टीका केली आहे. त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) हे आज (शुक्रवार) नंदूरबारमध्ये Nandurbar पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत ?
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज नंदूरबार येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना भाजपची खिल्ली उडवली.
चंद्रकांत पाटलांचा (Chandrakant Patil) काल (गुरुवारी) वाढदिवस होता.
त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका,
असं सांगतानाच शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे.
त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा,
असं आव्हानच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.

काँग्रेस Congress हा देशातला प्रमुख विरोधी पक्ष असून त्यांचे अनेक तरुण नेते पक्ष सोडून जात आहे.
त्यांनी संघटना मजबूत केली पाहिजे कारण विरोधी पक्ष हा लोकशाहीसाठी अधिक मजबूत हवा हे आपण काँग्रेसबाबत म्हटलं असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे,
तसेच, यावेळी त्यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत.
एखादा सर्व्हे करण्यासाठी अथवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांना भेटले असतील.
त्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) दिल्लीत भेट घेतली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं.
शिष्टाचाराचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधानांना भेटायला गेले होते.
या भेटीत महाराष्ट्रातील समस्यांवर चर्चा झाली.
त्यामुळे या भेटीवर राजकारण Politics करण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाबाबत Maratha reservation आता राज्याची भूमिका राहिलीच नाही.
आता केंद्रालाच भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

कोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू