Sanjay Raut : ‘जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यात झालेल्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात झालेल्या व्यक्तिगत भेटीबाबत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. यामुळे राज्यात नव्या राजकीय तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

ती भेट नक्कीच महत्त्वाची
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.8) दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यामध्ये काही काळ मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी वन टू वन चर्चा केली.
या भेटीनंतर राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळणार का, या प्रश्नावर संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच.
जर चर्चा सुरु झाली असेल, तर नक्कीच ती भेट महत्त्वाची होती, असे सूचक विधान केलं आहे.

पंतप्रधानांचा दृष्टीकोन सकारात्मक
मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ भेटले यामध्ये पंतप्रधानांचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचे मला सांगण्यात आले.
ते तासभर सगळ्यांना भेटले.
याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही काळ चर्चा केली.
या दोन्ही चर्चा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्याविषयी आम्हाला आदर
ठाकरे आणि मोदी यांच्यातील चर्चेमुळे राजकीय संदर्भ ज्यांना काढायचे आहेत, त्यांना काढू देत. नरेंद्र मोदींविषयी आम्हाला नेहमीच आदर आहे. ठाकरे परिवार आणि मोदींचे जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींच्या मनात किती आदर आहे, हे मोदींनी कित्येकवेळा बोलून दाखवले आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हीही नेहमीच त्यांचा आदर केला आहे, असेही राऊत म्हणाले.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत