Shivsena MP Sanjay Raut | ‘निकले हैं वो लोग हमारी..’! राज ठाकरेंच्या त्या ट्विटनंतर संजय राऊतांचं Tweet; CM उद्धव ठाकरे, शरद पवारांना टॅग करत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | मशिदींवरील भोंग्यांवरुन (Loudspeaker On Mosque) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सरकारला इशारा दिला. 4 मे चा अल्टीमेटमचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने आजपासून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारपासून मशिदींमधून भोंग्यांवर अजान ऐकू (Azaan On Loudspeaker) आल्यास हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी याबाबत पत्रक जारी केलं. त्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी देखील ट्विटरवरुन शेरोशायरीद्वारे सुचक विधान केलं आहे. विशेषत: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचे ट्विटर हॅण्डल टॅग केलंय.

 

मशिदीवरील भोंग्या बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रात्री 8 वाजून 13 मिनिटांनी ट्विटरवरुन पत्रक जारी केलं. त्यानंतर लगेच संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी देखील एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये राऊत यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं अकाऊट टॅग केलं आहे. “निकले हैं वो लोग हमारी शख्शियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं,” असं म्हटलं आहे. याचा अर्थ की ज्यांच्या स्वत:च्या व्यक्तीमत्वाला आणि भूमिकाला डागडुजीची गरज आहे तेच आता आमच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना ट्विटरवरुन लगावला आहे.

 

राज ठाकरेंच्या ट्विटमध्ये काय ?

जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद दाखवून द्या.

 

मशिदीवरील सर्व भोंगे अनधिकृत आहेत.
सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या कशा देते.
त्यांना परवानगी देणार असाल तर देवळांनाही परवानगी द्यायलाच हवी.
रस्त्यावर नमाजसाठी बसणे, वाहतूक कोंडी करणे कोणत्या धर्मात बसते. भोंग्यांचाही विषय हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे.
पण या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजे अशी भूमिका जाहीर केली होती.
ते तुम्ही ऐकणार आहात की नाही.
की सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात, याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर होऊन जाऊ दे,
असे आव्हान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले आहे.

देशातील शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत.
आपण धर्मासाठी हट्टीपणा सोडणार नसाल तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही.
सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात येऊन द्यावीत.
मशिदीत बांग सुरू झाल्यावर पोलिसांच्या १०० क्रमांकावर भोंग्याचा त्रास होत असल्याची तक्रार करावी.
ती रोज करावी, असा कार्यक्रमही राज ठाकरे यांनी जाहीर केला.
तसेच ज्या मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत त्याचे स्वागत करत त्या मशिदीच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही याची हिंदुंनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | sanajay raut tweet tagging sharad pawar uddhav thackeray after raj thackeray tweets letter

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा