Shivsena MP Sanjay Raut | ‘मी माझा एकांत सत्कारनी लावला’, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. आमचे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी माझ्यावर टीका करताना संजय राऊत यांना ईडीकडून (ED) अटक होईल, त्यांनी एकांतात स्वत:शी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असे म्हटले होते. मला त्यांना सांगायचे आहे की, मला ईडीने जी अटक केली होती ती बेकायदेशीर (Illegal) होती असं कोर्टाने म्हटलं आहे. राजकारणात शत्रूच्याबाबतही आपण असं चिंतू नये की तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जस सावरकर (Savarkar) होते, अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) होते. मी माझा एकांत सत्कारनी लावला, असे संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) म्हणाले.

माझ्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही

कोर्टाने मला जामीन दिला आहे. पूर्ण देशात जल्लोषाचा माहोल होता. मी टिपणी करणार नाही, ना ईडी ना ज्यांनी कट रचला त्यांच्यावर, त्यांना आनंद मिळाला असेल तर ठिक. माझ्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही. जे मला भोगावं लागलं, ते मी भोगलं, कुटुंबाने, माझ्या पक्षाने भोगले, खूप गमावलं. राजकारणात हे होत राहत. परंतु अशाप्रकारचं राजकारण देशाच्या इतिहासात कधी घडलं नाही, असेही संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले.

कोठडीतील दिवस खडतर होते

तीन महिन्यांनी हाताला घड्याळ बांधलं आहे. लोक मला विसरले असतील असं वाटलं, पण तसं झालं नाही.
लोकांना माझी काळजी आहे. प्रेम आहे. अनेकांचे फोन आले.
आज सकाळीच शरद पवारांचा (Sharad Pawar) फोन आला. त्यांचीही प्रकृती ठीक नाही.
कोठडीतील दिवस खडतर होते. मी कायदेशीर बाबींवर जास्त बोलणार नाही, असेही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाचे केले कौतुक

महाराष्ट्रात नव सरकार (Government of Maharashtra) बनलं आहे, काही निर्णय सरकारने चांगले घेतले
आहेत. त्याचं स्वागत करेन, विरोधासाठी विरोध करणार नाही.
जे देश, राज्य किंवा जनतेसाठी भल्याचं असेल त्याचं स्वागत करेन, राज्यात देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) काही चांगले निर्णय घेत आहेत. जेव्हा पेपर वाचायला मिळत होता, तेव्हा हे पाहत होतो,
गरिबांना घर देण्याचा निर्णय, म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय हे चांगले निर्णय असल्याचे सांगत राऊत
यांनी फडणवीसांच्या निर्णयाचे कौतुक केले.

Web Title :-  Shivsena MP Sanjay Raut | sanjay raut press conference after bail attack on mns chief raj thackeray also said he will meet devendra fadnavis narendra modi amit shah

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update