×
Homeताज्या बातम्याShivsena MP Sanjay Raut | ...म्हणून संजय राऊतांनी केले चंद्रकांत पाटील यांचे...

Shivsena MP Sanjay Raut | …म्हणून संजय राऊतांनी केले चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय नेतृत्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM) केलं, असे विधान चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करत चिमटा काढला आहे. तसेच संजय राऊतांनी (Shivsena MP Sanjay Raut) भाजपवरही (BJP) टीकास्त्र सोडले आहे.

 

संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, चोऱ्यामाऱ्या करुन आलेलं सरकार टिकणार नाही. आधी सरकार स्थापन करा मग बोला. मी चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतो. कारण भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. भाजपमध्ये मनमोकळं बोलता येत नाही. चंद्रकांत पाटील खरं बोलल्याने त्यांचे अभिनंदन असे म्हणत त्यांनी चिमटा काढला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले, अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय नेतृत्वाने दिलेला निर्णय मान्य केला.
केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं.
याचं दु:ख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता.
हे सरकार सत्तेत येणं खूप गरजेचं होतं. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. त्यामुळे हे खूप गरजेचं होतं, असंही ते म्हणाले.

 

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांचे हे भाषण माध्यमांमध्ये आल्यानंतर सगळ्या सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आलं.
तर आपल्या सगळ्यांचे नेते हे एकनाथ शिंदे आहेत, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केली.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | shiv sena mp sanjay raut pinched chandrakant patil bjp vs shiv sena on maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | फक्त 12 दिवस आणखी ! सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढतील 27000 रुपये, मोदी सरकार करणार घोषणा

 

Shivsena | चालते व्हा, शिवसेनेकडून कारवाई सुरुच, शिंदे गटात सामील खासदारांची पदावरून हकालपट्टी

 

Chandrakant Patil | ‘दु:ख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचं ऐकलं’, चंद्रकांत पाटलांचा ‘त्या’ वक्तव्याची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News