Shivsena MP Sanjay Raut | दिल्लीच्या प्रतिष्ठित भागात राहतो, PM मोदी माझ्या घराच्या समोर राहतात – संजय राऊत

पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी रविवारी पुण्यातील भोसरीमध्ये (Bhosari) शिवसैनिकांना संबोधित केले. संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात शिवसैनिकांना संबोधित करताना आपला महापौर बनवण्याचा संदेश दिला. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष भाजपावर सुद्धा जोरदार हल्ला केला.

संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचे पुण्यासोबत असलेल्या भावनिक नात्याचा उल्लेख केला आणि म्हटले की, बाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला होता परंतु येथे त्यांचा पक्ष शिवसेना सत्तेत नाही. त्यांनी हे सुद्धा म्हटले की, उद्धव ठाकरे यांना आता दिल्लीत स्थान बळकट करायचे आहे यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. शिवसेना प्रवक्त्यांनी असेही म्हटले की, जर शिवसेना नसती तर तिच्याशिवास आज आपण काहीही नसतो.

त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना म्हटले की, तुम्ही शंभर नगरसेवक (corporator) निवडून आणा. इतके नगरसेवक निवडूण आणा की महापौर शिवसेनेचाच (Shivsena Mayor) होईल. राज्य सरकारमधील सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नाव न घेता राऊत म्हणाले, जर तुम्ही सोबत निवडणूक लढणार असाल तर चांगली गोष्ट आहे. जर तुमची ही इच्छा नसेल तर तुमच्याशिवाय सुद्धा आम्ही लढू शकतो.

त्यांनी एकीकडे राष्ट्रवादीला संदेश दिला तर दुसरीकडे भाजपावर सुद्धा हल्लाबोल केला.
भाजपावर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत सर्वात प्रतिष्ठित भागात राहतो.
लोकांना माझ्या पत्त्याबाबत काय सांगू. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) माझ्या घरासमोर राहतात.
संजय राऊत असेही म्हणाले की, भोसरी परिसरातून शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला नाही.
ते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister uddhav thackeray) यांचे म्हणणे ऐकतात.

हे देखील वाचा

Pune-Mumbai Expressway | ट्रेलरमधील कागदाचे मोठे रिळ कारवर पडले, एकाचा मृत्यू; घाटात वाहतूककोंडी

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! लागोपाठ दुसर्‍या दिवशी वाढले डिझेलचे दर, जाणून घ्या नवीन दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Shivsena MP Sanjay Raut | shiv sena rajya sabha mp sanjay raut chief minister uddhav thackeray delhi ncp bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update