Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना युपीएचा भाग नाही – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Parliament Winter Session) बिगर भाजप (BJP) पक्षांची एकत्रित रणनिती आखण्यासाठी तसेच, संसदे बाहेरही विरोधी पक्षांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांनी पुढाकार घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक मंगळवारी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झाली. आगामी काळात राज्या-राज्यांत विरोधकांचे धोरण ठरवण्यासाठी बैठका घेण्यात येणार आहेत. बुधवारीही विरोधी पक्षनेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहीती खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी दिल्लीत पत्रकारांना दिली. यावेळी संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी मोठे विधान केले आहे.

 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. देशातील सध्याची राजकीय स्थिती तसंच उत्तर प्रदेशसह ज्या राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly election) आहेत तेथील स्थितीवर तसेच त्यात विरोधी पक्ष साधारण एकत्रितपणे काय भूमिका निभावू शकतो यावर प्रथमिक चर्चा झाल्याचे संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी सांगितले.

 

भविष्यात अशा बैठका वेळेत व्हाव्यात

या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar), फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah), सीताराम येचुरी (Sitaram Yechury) हे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने मी हजर होतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला तिथे उपस्थित राहण्यास सांगितले होते. कारण सोनिया गांधी यांनी बैठकी संदर्भात त्यांना फोन केला होता. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पुन्हा लवकरच बैठक व्हावी अशी सूचना शरद पवार यांनी मांडली. त्यावरही फार वेळ न लावत भविष्यात अशा बैठका वेळेत व्हाव्यात जेणेकरुन सर्वांना सोयीचं होईल अशी भूमिका घेण्यात आली, असे संजय राऊत यांनी सांगितले.

 

आम्ही युपीएचा भाग नाही

शिवसेना (Shivsena) अधिकृतपणे युपीएचा (UPA) भाग झाली आहे का नाही?
असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले, आम्ही युपीएचा भाग नाही.
पण महाराष्ट्रासारख्या (Maharashtra) मोठ्या राज्यात आम्ही एकत्र काम करत आहोत.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे (NCP) तीन प्रमुख पक्ष जेव्हा एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतात,
काम करतात तो मिनी युपीएचाच प्रयोग आहे. राज्य स्तरावरील हे युपीए असून उत्तम प्रकारे काम सुरु आहे, असे राऊत म्हणाले.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | shivsena is not part of UPA says shivsena leader and MP sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा