Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला; म्हणाले – ‘तुम्ही नेमके का गेलात, ते एकदाचे ठरवा, गोंधळू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून आल्याचं पाहायला मिळालं. सोबत असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मोठ्या भूमिकेमुळे राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) बोलताना म्हणाले, “जेव्हा आमदारांनी मुंबईतून पलायन केलं त्यावेळी पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की, हिंदुत्व अडचणीत आलंय त्यामुळं आम्ही गेलोय. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधी देत नव्हता. तिसऱ्या दिवशी हे म्हणाले की, पक्षातील काही लोकं हस्तक्षेप करत होते, म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता चौथ्या वेळेला ते माझं नाव घेत आहेत. त्यांनी एक ठरवावं. नेमकं ते का बाहेर पडलेत यासाठी त्यांनी कार्यशाळा घ्यायला हवी. एकदा ठरवा की तुम्ही का गेले आहात. गोंधळू नका, लोकांना गोंधळात टाकू नका.”

पुढे संजय राऊत म्हणाले, “मी कधी सरकारी कामात पडलो नाही. मी संघटनेच्या कामात आहे, सामनात काम करतो.
मुख्यमंत्र्यांच्या जवळपास मला तुम्ही खूप कमी पाहिलं असेल. पक्षाचे काम असेल तरच मी त्यांना भेटतो.
संदिपान भुमरेंनी (Sandipan Bhumre) सरकार आल्यावर ‘तुमच्यामुळे सरकार आले आणि आम्ही मंत्री झालो’ म्हणत सामना कार्यालयात माझ्यासमोर लोटांगण घातलं.
त्याचे व्हिडीओ फुटेज देखील असतील. संजय राठोड आदल्या दिवसापर्यंत माझ्याबरोबर बसले.
संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या संकटात उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले, हे सगळ्यांना माहितीय.
आमचं मन साफ आहे, कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या,”

 

दरम्यान, “जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) यांची चौकशी थांबवली हे दुर्दैवी आहे.
त्यांची चौकशी का सुरु होती ? हे चौकशी थांबवण्याचे आदेश देणाऱ्यांनी लोकांना सांगायला हवं.
आधीच्या सरकारने ही चौकशी का लावली हे तपासायला हवे. माझ्याकडे याबाबत अधिकची माहिती आलेली नाही.
मी यावर अधिक याक्षणी बोलत नाही कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut on shiv sena rebel mla mumbai maharashtra politics political crisis cm eknath shinde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा