Shivsena MP Sanjay Raut | ‘फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला जड जातंय; पण…’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | भाजपचे नेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, अशी राज्यभर चर्चा होती. मात्र, ऐनवेळी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नावाची घोषणा झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला गेला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत Shivsena (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

“पडद्यामागची इनसाइड स्टोरी फडणवीस यांच्याकडे नेहमी माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं होतं. त्यांना उपमुख्यमंत्री म्हणायला मला खूप जड जात आहे,” असं संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. त्यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत बसलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री व्हा असा आदेश दिला जातो आणि ज्युनिअर मंत्री असलेल्या दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास कोणाला आनंद होईल?,” असा प्रश्न देखील राऊत यांनी केला.

 

राऊत म्हणाले, “फडणवीसांनी पक्षाचा आदेश मानला. याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं, त्यानंतर राऊत यांनी भाजपवर टीकाही केली.
भाजपला (BJP) मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईतील शिवसेनेची ताकद नष्ट करायचीय.
त्यासाठी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदुक ठेवली आहे. मुंबईत शिवसनेनेचाच पराभव करण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं.
जनतेला भ्रमिष्ट करणं ही भाजपची रणनीती आहे आणि शिंदेही आता याच मार्गाने जात आहेत,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | Shivsena leader and mp sanjay raut reaction to bjp decision to give devendra fadnavis the post of deputy chief minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra State Wrestling Association | भारतीय कुस्ती संघटनेचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त; शरद पवारांना धक्का

 

Hingoli Accident News | हिंगोली शहर हादरलं ! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 2 तरुणावर काळाचा घाला

 

Uddhav Thackeray | शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा मोठा निर्णय ! आता शिवसैनिकांना द्यावे लागणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

 

Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात जोर’धार’ ! आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज