Shivsena MP Sanjay Raut | ‘एकनाथ शिंदे गटातील आमदार MIM मध्येही जाऊ शकतात’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे. तसेच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) देखील आक्रमक झाल्याचे दिसते. आजही त्यांनी शिंदे गटाला इशारा देत लक्ष्य केलं आहे. शिंदे गट यांना आमदारकी वाचवायची असेल तर त्यांना कोणत्या तरी पार्टीत विलीन व्हावे लागेल. अशावेळी ते सारे लोक एमआयएम (AIMIM) पक्षातही जाऊ शकतात,’ असं राऊत म्हणाले.

 

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, “शिंदे गटातील लोक एमआयएम पक्षातही जाऊ शकतात, ते कम्युनिस्ट पक्षातही जाऊ शकतात, ते समाजवादी पार्टीतही जाऊ शकतात. त्यांना मनसे (MNS) मध्ये जायचं असेल तर त्यांनी खुशाल जावं. अशा गोष्टींमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ही ऐतिहासिक गोष्ट म्हणावी लागेल. पण ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला, सर्व काही दिलं ते लोक जर एखाद्या दुसऱ्या पक्षात जात असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही,” असं ते म्हणाले.

 

पुढे राऊत म्हणाले, “मी बाप काढला असं लोक म्हणतात. पण मी एक ट्वीट केलंय त्यात गुलाबराव पाटलांनीच बापाची भाषा केली आहे. त्यामुळे ही भाषा माझी नाही, त्यांची स्वत:चीच आहे. जे लोक 40-40 वर्षांपासून आमच्या पक्षात आहेत आणि आता पळून गेले आहेत. त्यांचा आत्मा मेला आहे. ते आता एखाद्या जिवंत प्रेतासारखेच आहेत. मी कोणाच्याही आत्मा आणि भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, “गुवाहाटीत बसलेले सर्वच आमदार आमचे जवळचे लोक आहेत. पण ही कायदेशीर लढाई आहे.
आता रोड फाईट आणि कायदेशीर लढाई अशी सुरू आहे. जर तुमच्याकडे 50 आमदार आहेत तर राज्यात येऊन सत्तास्थापना करा.
असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, केंद्र सरकार (Central Government) त्यांना सुरक्षा देत आहेत.
पण लोकांचा रोष आणि संताप कोणालाही रोखता येणार नाही. महाराष्ट्रातही हवा, पाणी, हॉटेल सगळे आहेत.
तिथं बसण्यापेक्षा महाराष्ट्रात परत या. तुमचा समाजाशी संपर्क तुटला आहे. परत येण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही.
मते ईडी नव्हे, तर जनता देणार असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | Shivsena leader and mp sanjay raut says eknath shinde mla group may enter in aimim or raj thackeray led mns shivsena revolt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold-Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Pune Metro | पुणेकरांसाठी खुशखबर ! लवकरच हडपसर-पुलगेट भागातही धावणार मेट्रो

 

Maharashtra Political Crisis | राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकते का ? 16 आमदारांचे निलंबन होऊ शकते का ? जाणून घ्या कायदेतज्ञांचं मत