Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेनेचे आणि अपक्ष आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात का निघालेत हे लवकरच समजेल’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेवरून राज्यात भूकंप झाला आहे. शिंदे गटात क्रमाक्रमाने शिवसेनेचे आणि अपक्ष आमदार सामील होत आहेत. त्यामुळे शिंदे गट अधिक मजबूत होताना दिसत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ शिंदे गटात आमदार का चाललेत हे लवकरच समजेल.’ असं संजय राऊत म्हणाले.

 

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे गटात आमदार का चाललेत हे लवकरच समजेल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष मजबूत आहे. अजूनही आमच्या संपर्कात सेनेचे बरेच आमदार आहेत. भाजपने आमदारांना डांबून ठेवले असून 17 ते 18 आमदार भाजपच्या (BJP) गटात ताब्यात आहेत,” असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.

 

पुढे राऊत म्हणाले, “शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत आहे.
चार आमदार आणि दोन खासदार, नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं होत नाही.
हे आमदार का गेले याची कारणे लवकरच समोर येतील,” असं ते म्हणाले.
तसेच, ‘आज सेनेच्या दोन आमदारांची नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आणि कैलाश पाटील (Kailash Patil) यांची पत्रकार परिषद होणार आहे,
यात ते सर्व कहाणी सांगतील. आमदार अमिषाला बळी पडले आहेत,’ असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, “मी या आमदारांना बंडखोर मानत नाही. आमच्या संपर्कात वीस आमदार आहेत.
ते जेव्हा मुंबईत येतील तेव्हाच या सगळ्याबाबत खुलासा होईल. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आम्ही काम केले आहे,
त्यामुळे अशा संकटांचा अनुभव आहे. काल रस्त्यावर उतरली ती खरी शिवसेना होती. माझ्यावरही ईडीचा दबाव आहे,
मात्र आम्ही पक्ष सोडलेला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शिवसेनेसोबत राहू,”असं देखील राऊत म्हणाले.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | Shivsena leader and mp sanjay raut says why why mlas running in eknath shinde group soon understand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Ramdas Athawale | ‘…म्हणून अजित पवारांसारखं एकनाथ शिंदेंचं बंड फसणार नाही’; रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

 

Eknath Shinde | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?