Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला; म्हणाले – “तर लगेच त्यांची आमदारकी रद्द होईल, कोर्टातही जावं लागणार नाही”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सरकारमधून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपचं सरकार स्थापन झालं. एकीकडे सत्तांतर झालं असतानाच दुसरीकडे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील 11 जुलैला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. त्यामुळे आख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष याकडे आहे. यावरुनच शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचे दिसतंय. अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे.

 

संजय राऊत म्हणाले, “शिवसेना पक्षाशिवाय बंडखोर आमदारांचं अस्तित्वच नसल्याचं राऊत म्हणाले आहेत. “ते शिवसेनेत नाहीत. विधिमंडळात त्यांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केला आहे. पण शिवसेनेशिवाय त्यांचं अस्तित्व नाही. ते भाजपात मनानं, तनानं विलीन झाले आहेत. धनानं तर कधीच विलीन झाले आहेत. तसेच, “ते आमचे एकेकाळचे सहकारी होते. त्यांनी असे खेळ करू नयेत. तुम्हाला शिवसेनेत राहायचं नाही हे तुम्ही स्पष्ट केलंय. मग तुम्ही लोकांना भरकटवू नका.”

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “तुम्ही शिवसेना सोडली आहे. पण तांत्रिकदृष्ट्या तुम्ही तसं बोललात, तर लगेच तुमची आमदारकी रद्द होईल.
कोर्टात जायचीही गरज नाही. किंवा त्यांनी शिवसेनेनं दिलेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग त्यांनी काहीही बोलावं”,
असं थेट आव्हान राऊतांनी यावेळी दिलं आहे. “40 आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर त्यांनी निवडणूक लढवावी.
मग आम्ही त्यांची दखल घेऊ.”

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | Shivsena leader and mp sanjay raut slams shivsena rebel mla eknath shinde challeng to resign

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा