Shivsena MP Sanjay Raut | ‘फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांचे राईट हॅंड’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कालच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यातून अनेक समिंश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी देखील महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत फडणवीसांना टोला लगावला आहे.

 

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “अडीच वर्षांपूर्वी शिवसेना भाजप युती झाली असती तर आज फडणवीस मोठ्या पदावर असते. त्यावेळी त्यांनी मोठं मन दाखवायला हवं होतं. मात्र फडणवीस यांची मोठ्या मनाची व्याख्या वेगळी दिसते. शिवसेना फोडण्याचा प्लॅन त्यांनी पूर्ण केला आहे,” असा हल्लाबोल राऊतांनी केला. ‘आजही मुख्यमंत्री शिंदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मानत असतील तर याचा आनंद आहे,’ असं देखील ते म्हणाले.

 

“जिथे ठाकरे तिथे शिवसेना हे सेनेचे सुत्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच आमचे नेते राहतील. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून राज्याचा कारभार पुढे न्यावा यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. पहिल्या दिवसापासून सरकार पडेल असं कोणतही विधान करणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला. शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री शिंदेंना भाजपाने घेतलं असेल तर त्याचा आनंद असल्याचंही,” राऊत म्हणाले.

दरम्यान, “या सरकारच्या कामात कोणताही अडथळा आणणार नाही.
एकनाथ शिंदे यांना मिळालेलं पद हे शिवसैनिकाला मिळालं असं म्हणणार नाही.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांचे उजवे हात असून आता दोघांना एकत्र
राज्याचा कारभार पुढे न्यायचा आहे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | Shivsena leader and mp sanjay raut wish to
cm eknath shinde and criticised to devendra fadanvis and bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा