Shivsena MP Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्री कोणत्याही कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजेरी लावत नाही. तसेच कोरोनासारखी परिस्थिती असतानादेखील ते घरातूनच आढावा घेत असल्याच्या कारणावरून मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका करण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात, मुख्यमंत्र्यांच्या कारभार दुसऱ्यांना सोपवण्याचा सल्लाही विरोधकांनी दिला होता. या सर्व टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत ठणठणीत असून विरोधकांनी चिंता करू नये. विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या तब्बेतीवर होणारी टिप्पणी म्हणजे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. त्यांना करण्यासारखी खूप कामे आहेत. पण विरोधकांना ते दिसत नसल्याचा टोलाही लगावला. (Shivsena MP Sanjay Raut)

 

पाच राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मात्र, निवडणूक आयोगाने कोरोनामुळे त्या ठिकाणी प्रचार सभा व रॅलीवर बंदी घातली आहे. या निर्णयावरही संजय राऊत यांनी टीका केली असून ते म्हणाले, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील भाजपच्या सभांना गर्दी जमली नव्हती. त्यामुळे आयोगाने असा निर्णय घेतला असावा. भाजपसाठी आयोगाने ही सोय केली आहे का असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.

गोव्याच्या राजकारणावरून भाजपवर टीका
गोव्यात मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी भाजपला (BJP) मोठ केलं आहे. त्यांच्यापाठोपाठ लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी देखील भाजपचा विस्तार केला. आता उत्पल पर्रीकरांनी (Utpal Parrikar) भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर पार्सेकरांनी देखील रामराम ठोकला. माफियांना पक्षात घेऊन भाजपने चांगल्या नेत्यांना गमावल असून त्याची फळ त्यांना जनताच देईल. बहुमत आणि सरकार बनवणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक मात्र, नक्की की गोव्यात कोणालाही बहुमत मिळणार नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | Shivsena MP Sanjay Raut criticized bjp over cm uddhav thackeray health issues

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा