Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊतांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील 1 हजार 034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) ईडीच्या कोठडीत (ED Custody) असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना आज पुढील सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा (Shivsena MP Sanjay Raut) पुढील 4 दिवसांचा मुक्काम ईडीच्या कोठडीत असणार आहे.

 

संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांची आज ईडी कोठडी संपली. त्यानंतर आज त्यांना पुन्हा विशेष PMLA कोर्टात (Special PMLA Court) हजर करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने 10 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी वाढवून मागितली होती. काही जणांना चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे, त्यामुळे संजय राऊत यांची कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली.

 

तर हे सर्व राजकीय आकसापोटी सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांचे वकील अ‍ॅड. मनोज मोहिते (Adv. Manoj Mohite) यांनी कोर्टात केला. कस्टडी वाढवण्याची गरज नाही, चौकशी कस्टडीशिवायही करता येते असा युक्तिवाद अ‍ॅड. मोहिते यांनी कोर्टात केला.

ईडीचे वकील हितेन वेणेगावकर (Adv. Hiten Venegaonkar) यांचा युक्तिवाद

प्रविण राऊत (Pravin Raut) याला पत्राचाळ प्रकरणी मिळालेली 112 कोटींच्या रक्कमेमधील काही रक्कम रोख स्वरुपात मिळाली. तसंच नॅशनल आणि इंटरनॅशनल प्रवासाकरता देखील प्रवीण राऊत याने राऊत परिवाराला पैसे दिले.

तसंच दर महिना दोन लाख रुपये प्रविण राऊत हा संजय राऊत यांना देत होता.

काही संशयास्पद कागदपत्रे जप्त केली होती ती संजय राऊत यांच्या समोर चौकशी दरम्यान सादर केली होती. पैशांच्या बाबतीत ती कागदपत्रे होते, त्याबाबत काहीच माहिती नाही असं राऊत बोलत आहेत.

काही अशा एका व्यक्तीला आम्ही चौकशीला बोलावले आहे ज्या व्यक्तीचे नाव आम्ही इथे घेऊ शकत नाही.
त्या व्यक्तीला आणि राऊतांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे.

राऊत आधीच्या चौकशीत ज्या आर्थिक व्यवहारांबाबत नकार देत होते याची कागदपत्रे त्यांच्या घरात झडती दरम्यान सापडली आहे.

सापडलेल्या कागद पत्रातून असे दिसतेय की संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut)
यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे.
वर्षा राऊत यांच्या खात्यातून खूप मोठ्या रक्कमेचा व्यवहार झाला आहे.
जवळपास 1 कोटी 8 लाख रुपये नुकतेच पाठवण्यात आले आहे. त्यामुळे संजय राऊत यांची 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी द्यावी.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | shivsena sanjay raut sends ed custody by pmla court mumbai

 

Pune Crime | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा आढळला संशयास्पद मृतदेह, आरोपी 24 तासात गजाआड

 

Maharashtra  Political Crisis |  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोमवारी सुनावणी, आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

 

CNG Price Hike | सीएनजीच्या  दरात आजवरची सर्वाधिक दरवाढ; 4 महिन्यात 29 रुपयांनी झाला महाग