Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांना शिवबंधन बांधा मग उमेदवारीचा विचार करू,’ असं म्हटलं. त्यानंतर संभाजीराजेंनी यावर नकार दिला आहे. आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘संभाजीराजे छत्रपतींनी 42 मतांची तजवीज केली का? असा सवाल करत आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. शिवसेना 2 जागा लढवणार असल्याचं,’ त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

त्यावेळी बोलताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले की, ”संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याच जाहीर केले आहे. त्यांनी ही घोषणा केली होती, त्याअर्थी त्यांनी जिंकून येण्यासाठी लागणाऱ्या 42 मतांची बेगमी केली असावी, असा माझा समज होता. परंतु, संभाजीराजे यांच्याकडे तेवढी मते नव्हती. तेव्हा संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे मदत मागितली. पण आम्हाला आमचे दोन उमेदवार निवडून आणायचे आहेत, मग आम्ही त्यांना आमची मतं कशी देणार? आम्हाला शिवसेनेला उमेदवार निवडून आणायचा आहे. राज्यसभेतील संख्याबळ वाढवायचे आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं,” राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले, ”आम्ही संभाजीराजेंना सांगितले की तुम्ही शिवसेनेत या आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा.
कारण राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणे आम्हाला गरजेचे असल्याचं ते म्हणाले. तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही दोन पावले मागं जातो,
तुम्ही छत्रपती आहात असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे. आता निर्णय त्यांचा आहे.
पण कोणत्याही परिस्थितीत 2 उमेदवार शिवसेनेचेच निवडून जातील.
ये मेरे मन की बात नही ये उद्धवजी यांची मन की बात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलंय.
संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, कारण या आमच्या जागा आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

 

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

 

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…