Sanjay Raut on Chandrakant Patil | ‘वाघ हा वाघ असतो, त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पहातोय मग बघू’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – वाघ हा वाघ (Tiger) असतो. त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पहातोय मग बघू, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी आज (रविवार) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत (Press conference) ते बोलत होते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

कोरोना असला तरी राजकारण थांबत नाही
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, सरकार काम करत असतं पण पक्ष संघटनेला गती मिळावी यासाठी कार्यकर्ता स्तरावर काम करावं लागतं. कोरोना (Corona) असला तरी राजकारण (Politics) थांबत नाही. सत्ता मागच्या पानावरुन पुढे नेत असताना तुम्हाला संघटना बळकट करणं आणि संघटनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी दौरे करावे लागतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सूचनेवरुन मी दौरा करत असल्याचं राऊत यांनी सांगितले.

 

चंद्रकांत पाटलांचं मन लहान मुलासारखं

चंद्रकांत पाटील यांनी आमची दोस्ती वाघाशी होती, पिंजऱ्यातील वाघाशी नाही असे म्हटले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील यांचं मन लहान मुलासारखं आहे. ते निष्पाप, निष्कलंक आणि निष्कपट नेते आहेत. वाघाच्या मिशीला हात लावायला ही हिंमत लागते. या मी वाट पहातोय, असं राऊत यांनी म्हटलं.

5 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री
राज्यात मुख्यमंत्री पदाच्या वाटाघाटी संदर्भात सध्या अनेक वावड्या उठत आहेत. यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, राज्यात शिवसेनेचाच 5 वर्षे मुख्यमंत्री राहिल (Chief Minister of Shivsena for 5 years). त्यात ना कोणाता वाटा किंवा घाटा होणार नाही. तशी कमिटमेंटच (Commitment) सुरुवातीला दिली गेली आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं.

Wab Title :- shivsena mp sanjay raut slams bjp leader chandrakant patil over shivsena tiger statement issue

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा