Shivsena MP Sanjay Raut | भाजपमध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का?

मुंबई न्यूज (Mumbai News): पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या घरावर ईडीने (ED) छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले (Summons were issued for questioning). या चौकशीसाठी अद्याप अनिल देशमुख (Anil Deshmukh) उपस्थित राहिले नसले, तरी त्यावरुन आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपने (BJP) सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) घेरण्यास सुरुवात केली आहे. यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधत प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. shivsena mp sanjay raut slams bjp on anil deshmukh ed inquiry pratap sarnaik letter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का ?

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणावरुन भाजपवर (BJP) निशाणा साधताना खोचक सवाल केले आहेत. अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घ्यायला हवी. भाजपच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का ? सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का ? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का ? बाकी सगळे हरामखोर आहेत का ? अशी प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केली आहे.

 

तिन्ही नेते एकत्र बसून पुढील पावलं टाकतील

खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी सांगितले की, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी बोललो. अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घेतली पाहिजे. यामधील अनेक मुद्दे मी देखील समजून घेतले आहेत. प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांच्यावर आरोप लावून ईडी (ED) किंवा केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचे आरोप भाजपच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का ? सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का ? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का ? बाकी सगळे हरामखोर आहेत का ? याचा राज्यातील 11 कोटी जनतेनं विचार करण्याची वेळ आली आहे. लवकरच त्यासंदर्भात मुख्यमंत्री, शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे नेते (Congress leader) एकत्र बसून पुढील पावलं टाकतील असं दिसतंय, असंही संजय राऊत म्हणाले.

Web Title : shivsena mp sanjay raut slams bjp on anil deshmukh ed inquiry pratap sarnaik letter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Income Tax Return | 30 जूनपर्यंत करा हे काम, अन्यथा भरावा लागेल दुप्पट TDS, जाणून घ्या नवीन नियमाबाबत सर्वकाही