संजय राउतांचा भाजपवर पलटवार, म्हणाले – ‘विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी (दि. 8) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेऊन राज्यातील विविध विषयावर चर्चा केली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर फडणवीस यांनी या भेटीचे स्वागत केले आहे. मात्र, आम्हाला सोबत नेलं असतं तर आनंदच झाला असता असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हटले होते. दरम्यान, यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पलटवार केला आहे. विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीत गेले होते.
या भेटीकडे सकारात्मकदृष्टीने पाहायला हवे. मेट्रो कारशेड अडकली आहे.
त्याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यावरही सकारात्मक चर्चा झाली आहे.
त्यामुळे विरोधी पक्षाने या भेटीचे स्वागत करावे. केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे.
त्यामुळे काही गोष्टी सरकारी असतात.

त्या केंद्राकडे न्याव्या लागतात, त्यांना राज्याच्या अडचणी सांगाव्या लागतात. विरोधी पक्षनेते फडणवीस जाणकार आहेत. याबाबत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना सल्ला अन् सूचना द्यायला हव्यात, असे सांगत राज्याच्या प्रश्नावर भाजप चिंतन करत असेल तर त्यांच्या बैठकीचं स्वागत असल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, राऊत आजपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी माझा दौरा सुरू आहे. इतर गोष्टी होतच राहतील, असे ते म्हणाले.

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘विषय राज्याच्या हाती, पाठपुरावा मात्र केंद्राकडे’

ज्योतिरादित्य शिंदेंनंतर भाजपकडून काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता लागला गळाला, थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार

Pune Crime News : पुण्यात रक्तचंदनाची तस्करी करणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं पकडलं; 27 लाखाचा माल जप्त

ट्विटर ला देखील फॉलो करा