Shivsena MP Sanjay Raut | ‘राज्यात सरकार अस्तित्वात नाही, राज्यपाल कुठे आहेत ?’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय सत्तानाट्य घडत आहे. शिंंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झालं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून मात्र अद्याप नव्या सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुन आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी टोला लगावला आहे.

 

त्यावेळी बोलताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, “महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊन झालंय. पूरामुळे शंभर पर्यंत लोकं मृत्युमुखी पडले आहेत. वादळाचे थैमान आहे. अशावेळी राज्यात सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असणे म्हणजे सरकार नाही. 12 दिवस झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे. न्यायालयात अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. अपात्र असताना मंत्रिपदाची शपथ देणे हे घटनाबाह्य आहे हे शिवसेनेने राज्यपालांना कळवलं आहे. राज्यपाल कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होते आता राज्यपाल कुठे आहेत ?,” असा सवाल त्यांनी केला.

“राज्यपाल बारा दिवस गप्प का ? राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यपालांनी राजभवनातून बाहेर पडलं पाहिजे,” असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, “राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्यामागे कुठलाही राजकीय हेतू किंवा नफा तोट्याचं गणित नस्ल्याचं राऊत म्हणाले.
अत्यंत मागास भागातून आदिवासी समाजातून येणाऱ्या महिलेला नेतृत्व मिळत असेल तर त्याचं समर्थन करण्यासाठी शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नेते आदिवासी भागात काम करतात.
त्यांच्या भावना समजून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा निर्णय घेतला असल्याचं,” ते म्हणाले.

 

“याआधी शिवसेनेने काँग्रेसच्या प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांना पाठिंबा दिला होता.
प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांना पाठिंबा दिला होता.
राष्ट्रपतीपदावर योग्य व्यक्ती बसत असेल तर त्यांचा सन्मान करणे ही शिवसेनेची परंपरा आहे.
आदिवासी समाजाप्रती असलेल्या भावनेतून आम्ही पाठिंबा दिला आहे.
तसेच आम्ही एनडीएचा भाग नाही,” असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | there is no government in the state where are the governors shiv sena sanjay raut targets bjp and eknath shinde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा