खासदार संजय राऊत लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टी (Angioplasty) शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल २०२० ही नियोजित वेळ होती.परंतु, कोरोना प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, एक वर्षापूर्वी महा विकास आघाडी सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू होती तेव्हा संजय राऊत यांना यांनी एखादी मैदान गाजवत भाजप नेत्यांच्या नाकीनऊ आणले होते या धावपळीत संजय राऊत यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राऊत यांच्यावर हे तज्ज्ञ करणार शस्त्रक्रिया

मॅथ्यू हे प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ आहेत. डॉ. अजित मेनन हे सुद्धा मुंबईस्थित हृदयविकार तज्ज्ञ आहेत. यापूर्वीही डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांनीच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती.

You might also like