ब्राम्हण मुख्यमंत्र्यांनीच ‘शेवटी’ मराठयांना आरक्षण दिलं, खा. उदयनराजेंकडून पराभूत झालेल्या नरेंद्र पाटलांचं ‘वक्‍तव्य’

बीड : पोलिसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ब्राह्मण फडणवीसांनीच मराठ्यांना आरक्षण दिले असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा राज्यात मराठा आणि ब्राह्मण असा वाद उभे राहण्याची भीती आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत म्हटले कि, राष्ट्रवादी कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देऊ शकले नाही. मात्र भाजपने हे साध्य करून दाखवले. नरेंद्र पाटील यांच्या अगोदर काल रासप अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी देखील अशाच प्रकारचे विधान करून खळबळ उडवून दिली होती.

बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विविध बँकांच्या जिल्हा समन्वयकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. नरेंद्र पाटील हे अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव सहन करावा लागला. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा सक्रिय झाल्याने ते विधानसभा लढविणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

काय म्हणाले नरेंद्र पाटील ?

यावेळी बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अनेक चांगल्या योजना राबविण्यात येत असून आतापर्यंत ६ हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांनी वेळेवर कर्ज फेडले तर त्यांचा विश्वास देखील वाढणार आहे आणि बँकांचा देखील त्यांच्यावरचा विश्वास वाढीस लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त