Shivsena-NCP MLA Disqualification Case | शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; जाणून घ्या का?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Shivsena-NCP MLA Disqualification Case | शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर आमदार अपात्रतेचा मुद्दा समोर आला. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीत कोणत्याही पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यात आले नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेण्यात आली होती.
दरम्यान आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. मात्र आधीचा खटला लांबल्याने सुनावणी होऊ शकली नाही. परंतु सरन्यायाधीशांनी अजित पवारांसह (Ajit Pawar) त्यांच्या ४१ आमदारांना पुढील तीन आठवड्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या याचिकेवर उत्तर देण्याची मुदत दिली आहे. तर शिवसेनेबाबत हे जुने प्रकरण असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या आमदारांनी कोर्टात उत्तरही सादर केले आहे.
त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या वकिलांना संकलन तयार करून सादर करण्यास सांगितले आहे. आज कोर्टात जे घडलं त्याबाबत वकील सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली की, शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत पुढच्या सुनावणीची तारीख दिली नाही. पण साधारतः सप्टेंबर महिन्यात हे प्रकरण सुनावणीस येईल. शिवसेनेचं प्रकरण हायकोर्टात न होता सुप्रीम कोर्टातच सुनावणी होईल.
त्याचा निकाल सप्टेंबर किंवा ऑक्टोबर येणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादीच्या प्रकरणात तीन आठवड्यात अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी उत्तर द्यावं असं कोर्टाने सांगितले आहे. दोन्ही प्रकरणाची पुढील तारीख एक दिवसांत कळेल असे त्यांनी सांगितले. तर आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण लवकरात लवकर सुनावणी घेऊन निकाल द्यावा अशी इच्छा प्रकट केली.
त्यावर सरन्यायाधीश यांनी संतापून मग तुम्हीच येऊन इथं बसा असे सुनावले. शिवसेनेच्या दोन्ही बाजूने संकलन दिल्यानंतर ही सुनावणी सुप्रीम कोर्टातच चालेल. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. आज दोन्ही प्रकरणासाठी मुहूर्त लाभला नसला तरी सप्टेंबरमध्ये तारीख येईल तेव्हा दोन्ही प्रकरणे ऐकले जातील आणि त्यावर निकाल येईल असं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलं.
शिवसेनेच्या प्रकरणात विलंब होत असल्याने आज ठाकरे गटाच्या वकिलांकडून खटल्यास विलंब होत आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तारीख द्यावी अशी आग्रही मागणी केली. त्यावर तुम्ही आमच्या इथं येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा. आमच्यावर खूप ताण असतो, तुम्हाला १-२ दिवसात तारीख दिली जाईल असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संतापून उत्तर दिले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा