शिवसेनेला ‘अवजड’ देणं भाजपला जाऊ शकतं ‘अवजड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजप दुसऱ्यांदा सत्तेत आली आहे. त्यानंतर भाजपने खाते वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. त्यात शिवसेनेला पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालय दिलं आहे. यावरून शिवसेनेत नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ही नाराजी नवर्निवाचीत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे कळवली आहे. त्यामुळे आता अमित शहा यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

केंद्रातलं अवजड उद्योग मंत्रालय आणि शिवसेना असं समीकरणच झालं आहे. याआधी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनाही अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हेच मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला आलं आहे. २०१४मध्ये अवजड उद्योग मंत्रालय शिवसेनेकडं होते.

दरम्यान, येत्या ऑक्टोबर मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होतील त्यात शिवसेना- भाजपची युती असणार आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेची युती राज्यात यशस्वी ठरली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची नाराजी भाजपला परवडणारी नाही. त्यामुळे यावर भाजप शिवसेनेला खाते बदलून देते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.