पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. खडसेच्या पक्ष प्रवेशाची माहिती देताना जयंत पाटील म्हणाले अजून काही नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. यावरून आता राज्याच्या राजकारणात भाजपाला गळती लागणार अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेने ऑफर दिली होती.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. अखेर आज त्या चर्चेला पूर्णविराम भेटला. या निर्णयाचं शिवसेनेच नेते व माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच अर्जून खोतकर यांच्याकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन करण्यात आले होते.

काय म्हणाले अर्जुन खोतकर

“भाजपने जे पेरले तेच आता उगवत आहे. मागच्या पाच वर्षात भाजपाकडून मेगा भरती करण्यात आली. तसेच आता भाजपाला उतरती कळा लागली आहे.एकनाथ खडसेंसारखे मोठे नेते आज राष्ट्रवादी पक्षात जात आहेत.त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तसेच आजही भाजपमधील अनेक नेते नाराज आहेत. त्यांनी त्यांच्या बुध्दीप्रमाणे निर्णय घ्यावा आणि पक्षांतर करावे. पंकजा मुंडे जर आमच्या पक्षात आल्या तर त्याचा आम्हाला आनंद होईल. आमच्या पक्षाची दारे त्यांच्यासाठी नेहमी खुले असतील. शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी पंकजा मुंढे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची विनंती करतो. तसेच आणखी कोणी भाजपा नेता, जर आमच्या पक्षात आला तर त्याचा आम्हाला आनंदच होईल, आम्ही त्यांचे स्वागतच करू असे सुद्धा अर्जुन खोतकर म्हणाले. एकनाथ खडसे यांच्याबरोबरच पंकजा मुंडेसुद्धा काही दिवसांपासून नाराज आहेत त्यामुळे त्या काही दिवस पक्षापासून दूर होत्या. विधान परिषदेवर डावलण्यात आल्यामुळे ते पक्षावर नाराज होते. मात्र काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड करण्यात आली होती.