Shivsena Offer To Vasant More | माजी नगरसेवक वसंत मोरे यांना राष्ट्रवादीनंतर शिवसेनेची ऑफर; थेट CM उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Offer To Vasant More | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा आदेश धूडकावल्याने माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना काल (गुरुवारी) मनसे पुणे शहराध्यक्ष पदावरुन काढून टाकण्यात आले. त्यांच्या जागी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची नुतन शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच रंगलं असल्याचं दिसत आहे. वसंत मोरे यांना राष्ट्रवादीची (NCP) ऑफर आली असतानाच आज थेट शिवसेनेची (Shiv Sena) ऑफर आल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडून वसंत मोरे यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. (Shivsena Offer To Vasant More)

 

वसंत मोरे हे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. पण, कालच त्यांनी स्पष्टीकरण देत आपण राज ठाकरे यांच्यासोबत सुरुवातीपासून होतो आणि यापुढेही राहू, असं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान आज मोरे यांना शिवसेनेकडून ऑफर आली आहे. युवा शिवसेना नेते वरुन सरदेसाई (Varun Sardesai) यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधत शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून ही विचारणा झाली आहे. (Shivsena Offer To Vasant More)

 

खरंतर वसंत मोरे शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप वसंत मोरे यांनी अधिकृत स्पष्टीकरण केले नाही. दरम्यान, आता वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत? याची पुणेकरांची इच्छुकता शिगेला पोहोचली आहे.

 

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकर न काढल्यास मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा. असा आदेश दिला होता. त्यानंतर मनसे (MNS) पक्षात मतभेद दिसून आली. अनेक मुस्लीम कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले. त्यावेळी वंसत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भुमिकेला विरोध करत मला माझा प्रभाग शांत पाहिजे असं ते म्हणाले होते. यानंतर वंसत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन काढून टाकण्यात आले आहे.

 

Web Title :- Shivsena Offer To Vasant More | shiv senas offer to mns leader vasant more

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा